Monday, August 17, 2020

Hotel & Waiter

हॉटेल आणि वेटर:



प्रस्तावना:

हॉटेलचे नाव हि जशी त्या जागेची ओळख असते तशी दुसरी ओळख तिथल्या वेटर मुळे मिळते. 

कितीही हॉटेल चांगले असेल आणि त्या वेटरने जेवण वाढताना जर चमचा तुमच्या मांडीत सांडवला कि सगळे मुसळ केरात. गॅरेंटी कि तुम्ही तिथे कधीही जाणार नाहीच. गम्मत आहे कि ह्यावर कधीही लिहिले जात नाही आणि आपण वेटर ना टीप देऊन विसरून सुद्धा जातो. वास्तविकतः जितका महत्वाचा शेफ असतो त्याहून कदाचित कमी का होईना पण थोडासा तरी महत्वाचा वेटर हा असतोच.  तो जबाबरदार असतो तुमच्या पूर्ण पुढच्या एक तासाच्या अनुभवा साठी 


chapter  १


माझा आज पर्यंतचा सर्वात आवडता वेटर असेल तो म्हणजे आराध्य , हा माणूस कर्नाटकी होता. ह्याला मराठी बोलता येत नव्हते पण तोडक्या मोडक्या हिंदी मध्ये बोलायचं पण चेहर्या वरील भाव नेहमी विनम्र. हा "हॉटेल रत्ना", (पिंपरी स्टेशन) मध्ये चाकरी करायचा.  हे हॉटेल थाळी आणि स्नॅक्स साठी प्रसिद्ध आहे. 

छोले भटुरे, डोसे , इडली, वडा हे उत्तम मिळते मिळते. पिंपरी वासियां साठी तर वरदान आहे हे हॉटेल म्हणजे . उगाच गाडी हाकत FC रोड वर जाऊन कोणी सांगितली वैशाली आणि वाडेश्वर मध्ये जायला , त्यापेक्षा ढेंगेवर असणाऱ्या रत्ना मध्ये जाऊन मस्त South Indian स्नॅक्स वर ताव मारायचा हा weekend चा ठरलेला बेत.  


हे आराध्य साहेब इथले कॅप्टन होते. आम्ही इथे प्रवेश केला की लगेच हजर आणि आम्ही जिथे बसू ते टेबले त्याच्या jurisdiction मधेच आहे असे दाखवत तो ताबा घेऊन टाकायचा. आम्ही विशेष तिखट खात नाही हे ह्याला अगदी चांगले माहित होते. त्यामुळे ऑर्डर दिली कि पुढे तिखट नको हे सांगायची गरज पडायची नाही. हे साहेब स्वतःच सांगून टाकायचे "आप फिकर मत करो, मै देख लुंगा" , म्हणजे आम्ही निश्चिन्त होऊन जेवण कधी येणार ह्याची वाट बघत बसायचे.


कधी कधी माझी मुलगी जी त्या वेळी ३ वर्षाची होती तिच्या साठी चेरी घेऊन ये, कधी रंगीत सरबत घेऊन ये ह्यामुळे तिची थोडीशी करमणूक वयाची. 

खरं तर हा काही कधी कुठल्या hotel management institute मध्ये न गेलेला पण त्याची शिस्त १ नंबर. कधीही कुठल्याही इतर वेटर वर आवाज चढवून बोलणार नाही पण वचक इतकी की त्याने सांगितले आणि ते झाले नाही २ मिनिटात असे होणार नाही.  


हळू हळू इतकं आराध्य आहे हे इतकं आंगवळणी पडलं कि आम्ही रत्ना मध्ये आराध्याचा पाहुणचार घ्यायला जातोय असेच वाटू लागले :)

एकदा हे साहेब गावी गेले होते दिवाळीच्या सुट्टी मध्ये तर त्याचं हजर नसणे अगदी प्रकर्षाने जाणवत होते. 


त्याच्या पुढील वेळेस गेलो तेव्हा परत आलेला होता आणि जरा हळवा वाटत होता. त्याने हळूच आवाजात सांगितले की मी पुढील आठवड्यात गावी जातो आहे आणि परत येणार नाही. वरचे वर हे पण सांगून गेला कि मी शेती साठी भांडवल जुळवायला आलो होतो आणि ते आता आहे म्हणून मी परत चाललो आहे.  मलाही थोडेसे वाईट वाटले पण त्याचे स्वप्न पूर्ण होते आहे ह्यातच सुख होते . आज त्याला भेटलेला १० वर्ष उलटून गेली पण अजूनही तो वल्ली लक्षात आहे. 


आता हे लिहून झाल्यावर मी माझा जुना नोकियाचा फोन चालू करून बघेन त्याचा नम्बर मिळेल का ते शोधेन , बघूया मी त्याला आठवतोय का ते :)


असो हा झाला chapter १. पुढील वल्ली आहे पंजाबी माणूस "केसर द ढाबा" मधील वजनदार रॉयल वेटर.  






Hotel Ratna, Pimpri: 
https://goo.gl/maps/tWDgLqQ1r9rVysL56